अँड.शिरीष पाटील स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धा: लावास क्रिकेट क्लब पनवेल विजयी

| पोयनाड | वार्ताहर |
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै.अँड शिरीष पाटील स्मृतीचषक 14 वर्षाखालील एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत लावास क्रिकेट क्लब पनवेल संघांनी अंतिम विजयी संघ म्हणून मान मिळवला आहे. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात लावास क्रिकेट क्लब संघांनी फायटर्स क्रिकेट अकॅडमी माणगाव संघाचा पराभव करत स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या लावास संघांनी 40 षटकांमध्ये 254 धावा फलकावर लावल्या,सलामीला आलेल्या युग जोशी आणि कबीर जगताप यांनी धुवाधार फलंदाजी करत प्रत्येकी 38 धावा केल्या नंतर मधल्या फळीती तेजस गिलबिले यांनी सर्वाधिक 78 व स्वराज थारकूडे यांनी 34 धावा काढून डावाला आकार दिला.

माणगाव संघाकडून आरुष जाधव व अजय जाधव यांनी प्रत्येकी 3 तर आयुष जुमारे यांनी 2 फलंदाज बाद केले.254 धावांना उत्तर देतांना माणगाव संघाकडून पार्थ दबडे 37 व सोहम पोरे यांनी 21 धावांची खेळी केली,दोन्ही फलंदाज बाद झाल्याच्या नंतर संघाचा डाव गडगडला माणगाव संघांनी सर्व गडी गमावत 97 धावा फलकावर लावल्या,लावास संघाकडून स्वराज थारकूडे यांनी टिचून गोलंदाजी करत 6 बळी घेतले तर ओंकार आंग्रे यांनी 2 गडी बाद केले,लावास संघांनी सामना 157 धावांनी एकतर्फी जिंकला.फायटर्स क्रिकेट अकॅडमी माणगाव संघाला स्पर्धेत द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले.

सामन्याचा सामनावीर म्हणून अष्टपैलू खेळाडू स्वराज थारकूडे व तेजस गिलबिले,स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू पार्थ दबडे,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रतीक दिघे तर संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करणारा युग जोशी याला मालीकावीर,उत्कृष्ट फलंदाज कबीर जगताप,उत्कृष्ट गोलंदाज स्वराज थारकूडे,इमर्जिंग प्लेअर आरुष जाधव व ओंकार आंग्रे यांना रायगड जिल्हा क्रिकेट असो.चे कार्याध्यक्ष जयंत नाईक,आरपीएलचे अध्यक्ष राजेश पाटील,डॉ.राजाराम हुलवान,लावास लुब्रिकन्ट्सचे मालक रतन खारोल,शंकर दळवी,माजी सरपंच भूषण चवरकर,अजित चवरकर झुंझारचे अध्यक्ष अन्वर बुराण,किशोर तावडे,दिपक साळवी,अजय टेमकर,संजय सातघरे,प्रवीण टेमकर,सुजित साळवी,महेंद्र पालव,योगेश चवरकर,संदीप जोशी,प्रितम पाटील,योगेश ठाकूर,अँड.भुपेंद्र पाटील अँड.पंकज पंडित,सागर कांबळे, रोहित काळे,रोहित कार्लेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.संपूर्ण स्पर्धेत जिल्ह्यातील 12 संघांनी सहभाग घेतला होता,प्रथम लिग व नंतर बाद फेरीनुसार स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेचं यशस्वी रित्या आयोजन केल्या बद्दल झुंझारचे सर्व क्रिकेट प्रेमींनी कौतुक केले.

Exit mobile version