। खोपोली । प्रतिनिधी ।
ठाणे व रायगड जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेले खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडाळाच्या पुढाकाराने लॉ कॉलेज सुरू करण्यात आले आहे. यावेळी प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ शुक्रवारी (दि.17) संपन्न झाला. बी.एल. पाटील तंत्रनिकेतनच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केटीएसपी मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष अबू जळगांवकर, जनता विद्यालयाचे अध्यक्ष कैलास गायकवाड, लॉ कॉलेजचे अध्यक्ष नरेंद्र शहा, सावरोली शाळेचे अध्यक्ष चंद्रकांत केदारी, छत्रपती विद्यालयाचे अध्यक्ष भास्कर लांडगे, लॉ कॉलेजचे अॅडमिनिस्ट्रेशन इंचार्ज आणि बी.एल. पाटील तंत्रनिकेतनचे प्रशांत माने, लॉ कॉलेजच्या अॅड. वर्षा घारे, अॅड. वैशाली मुके, अॅड. तनिष्का देशमुख, अॅड. प्राची देशमुख उपस्थित होते.