लक्ष्मण दरवडा, ऋतुजा सकपाळ विजेते

जेएसडब्ल्यू आयोजित मॅरेथॉन स्पर्धा
। गडब । वार्ताहर ।

भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जेएसडब्ल्यू स्टील डोलवी कंपनी आयोजित अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात लक्ष्मण दरवडा, तर महिला गटात ऋतुजा सकपाळ यांनी विजेतेपद मिळवले.

या मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक लक्ष्मण दरवडा (वाक्रुळ-पेण), द्वितीय क्रमांक स्वराज पाटील (खार सापोली-पेण), तृतीय क्रमांक कुणाल माळी (उरण), उत्तेजनार्थ निहार म्हात्रे तर महिला गटात प्रथम ऋतुजा सकपाळ (रामवाडी-पेण), द्वितीय मयुरी चव्हाण (उरण), तृतीय क्रमांक प्राची पाटील (हनुमानपाडा-पेण), उत्तेजनार्थ पारितोषिक तृप्ती पाटील यांना देण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण वडखळ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, जेएसडब्ल्यूचे राजेश रॉय, दिलीप सिन्हा, अरुण नायगम, आत्माराम बेटकेकर, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विश्‍वनाथ पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यापुढे वेगवेगळ्या गटात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जनरल मॅनेजर राजेश कुमार रॉय यांनी सांगितले. जेएसडब्ल्यू कंपनीने या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करुन येथील तरुणांना आपले क्रीडा नैपुण्य दाखविण्याची संधी प्राप्त करुन दिली. अशा स्पर्धा कंपनीने सात्यत्याने घ्याव्यात, असे विश्‍वनाथ पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version