लक्ष्मण आयपीएलमध्ये परतणार

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक स्टाफमध्ये मोठा बदल झाला आहे. आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या मुख्य पदांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. सध्या बंगळुरू येथे असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण काम पाहात आहे. पण त्याचाही कार्यकाळ लवकरच संपणार आहे. एका रिपोर्ट्सनुसार लक्ष्मण ही जबाबदारी पुढे कायम करु इच्छित नाही. त्याने राहुल द्रविडच्या जागेवर 2021 ला ही जबाबदारी खांद्यावर घेतली होती. पण आता त्याला कार्यकाळ सप्टेंबर 2024 मध्ये संपणार आहे.

यादरम्यान, एका वृत्तानुसार व्हीव्हीएस लक्ष्मण आयपीएलमध्ये परतू शकतो. लखनौ सुपर जायंट्सने लक्ष्मणची संपर्क साधला असल्याचेही समजत आहे. त्याला 2025 मध्ये संघाच्या प्रशिक्षकाचा भाग म्हणून सामील करण्यासाठी त्याला संपर्क साधण्यात आल्याचे म्हटले जात आहे. लखनौ संघाचे सध्या मुख्य प्रशिक्षकपद जस्टिन लँगर यांच्याकडे आहे. तसेच लान्स क्लुजनर सहाय्यक प्रशिक्षक असून मॉर्ने मॉर्केल गोलंदाजी प्रशिक्षक आहे. त्याचबरोबर जॉन्टी र्‍होड्स क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आहे. लखनौव्यतिरिक्त अन्य काही आयपीएल फ्रँचाझींनीही त्याच्याशी संपर्क साधल्याचे समजत आहे.

Exit mobile version