ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची सरशी

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर होऊन यामध्ये महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून आल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. तालुक्यातील खानाव व जांभिवली ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागून त्यामध्ये खानाव येथून महाविकास आघाडीच्या अर्चना पांडुरंग दिसले या विजयी झाल्या आहेत. तर जांभिवली येथून मनी गोपाळ कातकरी या विजयी झाल्या आहेत. या दोन्ही उमेदवारांनी भाजप उमेदवारांचा पराभव केल्याने महाविकास आघाडीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Exit mobile version