गिरनार सर करणाऱ्या लहान गिर्यारोहक शर्वीका म्हात्रेचा शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी केला गौरव

अलिबाग । विशेष प्रतिनिधी |
बालगिर्यारोहक कुमारी शर्विका जितेन म्हात्रे हिने गुजरात मधील सर्वोच्च गिरनार पर्वत मोहीम फत्ते झाल्यानंतर शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.
रायगड सह अवघ्या महाराष्ट्राचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात नेणाऱ्या बालगिर्यारोहक कुमारी शर्विका जितेन म्हात्रे ( लोणारे ) हिला संपूर्ण राज्यात दाशविक्रमी तसेच रायगडची हिरकणी म्हणून संबोधले जाते, शर्विका म्हात्रे अवघ्या चार वर्षाची असून तिने आत्तापर्यंत चार विश्व विक्रम आपल्या नावावर नोंदविले आहेत तसेच तिची आत्तापर्यंत अकरा रेकॉर्ड बुक मध्ये नोंद झालेली आहे, ह्यामध्ये प्रामुख्याने इंडिया बुक रेकॉर्ड,आशिया बुक रेकॉर्ड, वर्ल्ड बुक रेकॉर्ड,लंडन, ओ. एम.जी.बुक रेकॉर्ड आणि डायमंड बुक रेकॉर्ड ह्यांचा समावेश आहे, कळसुबाई शिखर सर करणारी शर्विका पुन्हा एकदा भारतातील सर्वात लहान आणि पहिली कन्या ठरली, नुकतेच दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी शर्विकाने गुजरात मधील सर्वोच्च शिखर गिरनार अवघ्या साडे पाच तासात सर केले आणि सलग चौथा विक्रम आपल्या नावे नोंदविला. वयाच्या चौथ्या वर्षी गिरनार शिखर सर करणारी शर्विका सर्वात लहान आणि पहिली कन्या ठरली. शर्विकाने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील 31 किल्ले सर केले आहेत.
खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे भूषण असलेल्या बालगिर्यारोहक कुमारी शर्विका जितेन म्हात्रे हिने मोहीम फत्ते झाल्यानंतर तिने शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. चित्रलेखा पाटील यांनी तिला सदिच्छा रुपी आशिर्वाद दिले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version