पहिल्या कसोटीसाठी रहाणेकडे नेतृत्व

दुसर्‍या कसोटीत कर्णधारपदी कोहली
रोहित, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराहला विश्रांती
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 16 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. कानपूरमध्ये 24 नोव्हेंबरपासून होणार्‍या पहिल्या कसोटीत अजिंक्य रहाणेकडे संघाचे नेतृत्व देण्यात आलू असून, कर्णधार विराट कोहली 3 डिसेंबरपासून मुंबईत होणार्‍या दुसर्‍या कसोटीत परतेल. बीसीसीआयने या कसोटी मालिकेत अनेक खेळाडूंना विश्रांती दिली.
टी-20 संघाचा नवा कर्णधार व सलामीवीर रोहित शर्मा, यष्टिरक्षक ऋषभ पंत व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व शमी कसोटी मालिकेत खेळणार नाहीत. बीसीसीआय सचिव जय शाहने म्हटले की,ङ्घकोहली दुसर्‍या कसोटीत परतेल आणि संघाचे नेतृत्व करेल.फ कोहली 17 नोव्हेंबरपासून होणार्‍या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत खेळणार नाही. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर व ऑफ स्पिनर जयंत यादवचे संघात पुनरागमन झाले आहे.
भारतीय संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्‍वर पुजारा, केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्‍विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्ण.

Exit mobile version