IRCTC अ‍ॅप, वेबसाइटद्वारे रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी जाणून घ्या नवी पद्धत…

। अलिबाग । वर्षा मेहता ।
भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) वेबसाइट किंवा त्यांच्या स्मार्टफोनवर अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर (अ‍ॅप) वापरून प्रवासी त्यांचे ट्रेन तिकीट काही मिनिटांत बुक करू शकतात. IRCTC रेल कनेक्ट अ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांना तिकीट बुकिंग आणि इतर अनेक संबंधित सेवांमध्ये प्रवेश प्रदान करते.
तथापि, तिकीट बुकिंगची सुरुवात करण्यासाठी, वापरकर्त्यांनी प्रथम त्यांच्या स्मार्टफोनवर प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप्पलच्या अ‍ॅप स्टोअरवरून IRCTC अ‍ॅप्लिकेशन, सॉफ्टवेअर डाउनलोड करणे आवश्यक आहे. तुम्ही प्रथमच हे अ‍ॅप वापकरत (नवीन वापरकर्ता) असाल तर, तुम्हाला अ‍ॅप वापरण्यापूर्वी नोंदणी करावी लागेल.
नोंदणीसाठी तुम्ही अधिकृत IRCTC वेब पोर्टलला भेट देऊ शकता. स्वतःची नोंदणी केल्यानंतर, तिकीट बूक करण्यासाठी पुढीलप्रमाणे प्रक्रीया-

  1. IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला irctc.co.in/mobile वर भेट द्या किंवा IRCTC अ‍ॅप डाउनलोड करा.
  2. तुमचा विद्यमान IRCTC वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड किंवा नवीन तयार केलेल्या युझर आयडीव पासवार्डचा वापर करुन लॉग इन करा.
  3. होमपेजवर ट्रेन तिकीट या विभागातील प्लॅन माय बुकिंग या पर्यायावर क्लिक करा.
  4. आता, तुमची प्रवासाची तारीख, ट्रेन, निर्गमन स्टेशन निवडा. त्यानंतर, सर्च ट्रेन्स टॅबवर क्लिक करा.
  5. तुमच्या स्क्रीनवर ट्रेनची यादी दिसेल. ट्रेन्सचा निर्णय घेतल्यानंतर, प्रवासी जोडण्यासाठी पॅसेंजर डिटेल्स या पर्यायावर क्लिक करा.
  6. तुम्ही पूर्ण केलेले सर्व बुकिंग तपशील तपासण्यासाठी आणि पुष्टी करण्यासाठी ‘Review Journey Details’ या पर्यायावर क्लिक करा.
  7. शेवटी, पेमेंट करण्यासाठी प्रोसीड टू पे या पर्यायावर टॅप करा. तुम्ही तुमचे मोबाइल वॉलेट, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेटीएम, यूपीआय किंवा नेट बँकिंग वापरून तिकिटांसाठी पैसे देऊ शकता.

एकदा तुमचे बुकिंग पूर्ण झाले की, तुम्हाला तुमच्या मोबाईलवर PNR, ट्रेन नंबर, वर्ग, प्रवासाची तारीख इत्यादीसह संपूर्ण तिकीट तपशीलांसह एक आरक्षण संदेश प्राप्त होईल.

Exit mobile version