शिक्षक मतदारांना 30 जानेवारीला रजा मंजूर

| अलिबाग | वार्ताहर |

कोकण विभागाची शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2022-23 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार शिक्षक मतदारसंघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून मतदानाच्या दिवशी दि. 30 शिक्षक मतदारांना नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली आहे.

कोकण विभागाची शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2022-23 या घोषित कार्यक्रमानुसार कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान सोमवार दि. 30 सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत या वेळेत होणार असून, शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली असून, ही रजा शिक्षक मतदारांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार असल्याचे उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यांनी कळविले आहे.

Exit mobile version