| म्हसळा | प्रतिनिधी |
आगामी म्हसळा पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता आरक्षणासाठी तहसीलदार साचिन खाडे यांनी सोमवारी (दि.13) सकाळी 11 वाजता विशेष सभा पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केली आहे. या विशेष सभेसाठी तालुक्यातील सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिक यांना सहभागी होण्याचे आवाहन तहसीलदार साचिन खाडे यांनी केले आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या नियम, 2025 नुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनु. जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करण्यासाठी सोडत पद्धतीने कार्यवाही होणार असल्याचेही खाडे यांनी सांगितले.






