| आगरदांडा | प्रतिनिधी |
देशभरातील सर्व आयटीआय संस्थांमध्ये एकाच वेळी सुरू करण्यात येणाऱ्या अल्पमुदत अभ्यासक्रमांच्या उद्घाटन कार्यक्रमाचा समारंभ बुधवारी (दि.8) संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन प्रसारणाद्वारे करण्यात आले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुरुड येथील वीर कोंडाजी फर्जंद आयटीआय व मजगाव येथील मेहरुन्निस्सा अब्बास फक्की करिमी हॉल येथे संयुक्तपणे करण्यात आले. ऑनलाईन उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे महत्त्व पटवून देत ‘कौशल्य भारत सक्षम भारत’ या संकल्पनेला बळकटी देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मेहरुन्निस्सा अब्बास फक्की संस्थेचे अध्यक्ष सैफुल्ला फिरफिरे, खजिनदार नौशाद शाबान, अझर उलडे, शबाब उलडे, आयटीआय व्यवस्थापन समिती सदस्य संजय ठाकूर आणि विकास बाळाराम कोळी तथा दोन्ही आयटीआयमधील शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.







