अंधश्रद्धेला ऊत, नागरिकांच्या चर्चेचा विषय
। कोर्लई । प्रतिनिधी ।
मुरुडमधील कल्याणी स्टॉप सबनीस आळीकडे जाणाऱ्या चौकात हायमास्ट दिव्याच्या खांबाखाली कोणा अज्ञात व्यक्तीने पपईवर काळी जादू केली असल्याचे दिसून आले. त्यामुळे आजही अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याचे उघडकीस आले असून हा प्रकार नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.
नुकतीच अमावस्या होऊन दोन दिवस होत नाहीत तो शहरातील एसटी बस स्टॉपपासून सबनीस आळीकडे जाणाऱ्या केणे पाखाडी नाका चिटणीस बंगल्यासमोर चौकात हायमास्ट दिव्याच्या खांबाखाली कोणा अज्ञाताने एका पपईवर टाचण्या टोचून गुलाल लावून उतारा टाकलेला आहे. त्यामुळे मुरुडमध्ये देखील आजही अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याचे बोलले जात असून नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.






