| उरण | प्रतिनिधी |
जेएनपीए बंदर परिसरातील गव्हाण फाटा येथील मालाची हाताळणी करणाऱ्या जेडब्ल्यूआर गोदामात भीषण आग लागली. ही आगीची घटना शनिवारी (दि.18) दुपारी 2.45 वाजताच्या सुमारास घडली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, आगीच्या ज्वाळा तसेच धुराचे लोट उसळल्याने कामगार वर्ग भयभीत झाले असून आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी गोदामात काम करणारे कामगार आपला जीव मुठीत धरून पळाल्याने थोडक्यात बचावले.
जेएनपीए बंदर परिसरात मोठ्या प्रमाणात देश परदेशात मालाची आयात निर्यात करणारी तसेच मालाची साठवणूक करणारी गोदाम आहेत. या गोदाम किंवा कंटेनर यार्डमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याने वारंवार आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच जेएनपीए बंदर परिसरातील गव्हाण फाटा येथील मालाची हाताळणी करणाऱ्या जेडब्ल्यूआर गोदामात भीषण आग लागण्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सदर आगीच्या ज्वाळा तसेच धुराचे लोट उसळल्याने कामगार वर्ग भयभीत झाले असून आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असल्याचे सांगितले जात आहे. गोदामात काम करणारे कामगार आपला जीव मुठीत धरून पळाल्याने थोडक्यात बचावले असले, तरी आग लागण्याच्या ठिकाणी कोणते कामगार जवळ होते याची माहिती उपलब्ध झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.






