माणगाव नगरपंचायतीची उद्या आरक्षण सोडत

माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांच्या उपस्थितीत आज सोमवार दि.15 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय भवन तहसील कार्यालय माणगाव येथे माणगाव नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या नामाप्र आरक्षणाच्या फेर सोडतीकरीता सुधारित आरक्षण व सोडतिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
माणगाव नगरपंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक 10 जानेवारी 2016 रोजी झाली होती.त्यावेळी 17 सदस्य असलेल्या या नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती नगरपंचायतीवर सत्ता मिळविली होती.या नगरपंचायतीची मुदत संपूण एक वर्ष पूर्ण होत आलेले आहे. कोविड संकटामुळे या नगरपंचायतीची निवडणूक लांबणीवर पडली.मात्र आता पुन्हा कोविड आटोक्यात आल्याने माणगावकरांना नगरपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहेत.त्यात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने लवकरच आता माणगाव नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजणार याची जोरदार चर्चा माणगाव नगरीत सर्वत्र सुरू आहे.

Exit mobile version