पाटील परिवाराकडे सामाजिक कार्याचा वारसा


मान्यवरांकडून चित्रलेखा पाटील यांच्या कार्याचे कौतूक
खोपोली | वार्ताहर |
सर्वसामान्य जनता संकटात असताना त्यांच्या मदतीला धावून जाण्याचा ज्येष्ठ नेते स्व.प्रभाकर पाटील यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पाटील परिवारातर्फे चित्रलेखा पाटील यांनी प्रामाणिकपणे जोपासला असल्याचे प्रशंसोद्गार पालकमंत्री अदिती तटकरे, खा.श्रीरंग बारणे आदी मान्यवरांनी काढले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खोपोली येथे सुरु करण्यात आलेल्या खोपोली,खालापूर डेडिकेटेड कोविड सेंटरचे लोकार्पण सोमवारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे,खा.श्रीरंग बारणे,खोपोली नगराध्यक्षा सुमन औसरमल,शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील,आम.महेंद्र थोरवे, प्रांत अधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार इरेश चप्पलवार,माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसूरकर, उपनगराध्यक्षा विनिता कांबळे, मुख्याधिकारी गणेश शेटे, पंचायत समितीच्या सभापती वृषाली पाटील, नगरसेवक मोहन औसरमल, सुनील पाटील, शिवसेनेचे नेते नवीनचंद्र घाटवळ, आरपीआयचे जिल्हा युवक अध्यक्ष नरेंद्र गायकवाड,अँड. मुनिदास गायकवाड,के.टी.एसपीचे अध्यक्ष संतोष जंगम,सचिव किशोर पाटील, राष्ट्रवादी कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष संतोष बैलमारे,पं.स.सदस्य उत्तम परबळकर यांच्यासह यांच्यासह खोपोलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोविड सेंटरला मदत करणार
दरम्यान,या कार्यक्रमात बोलताना चित्रलेखा पाटील यांनी खोपोलीतील या कोविड सेंटरला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.सर्व पक्षांनी एकत्र येऊन जनतेच्या सोयीसाठी हे कोविड सेंटर सुरु केले आहे जेव्हा पहिली लाट आली तेव्हा आमदार जंयत पाटील म्हणाले होते की, खर्‍या अर्थाने युवा पिढीने सामाजिक चळवळीत उतरावे लागेल.तोच संदेश मानुन आम्ही आता सार्वजनिक कार्यात कार्यरत झालेलो आहोत. एक वेगळ्या पध्दतीचे काम तरूण पिढीला करावे लागणार आहे आणि ती जबाबदारी सांभाळत, आज पर्यंत मी सर्वच गांवागावात पोहचत असे त्या म्हणाल्या. खोपीलीतील कोविड हॉस्पिटल हे राज्यातील दुसरे रुग्णालय आहे. जिथे विनामुल्य सेवा उपलब्ध होणार आहे. सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन तयार झालेल्या या हॉस्पिटलच्या प्रशासनावर दबाव असणे गरजेचे आहे.या सेंटरसाठी जे जे सहकार्य लागेल ते करण्याची ग्वाही देखील चित्रलेखा पाटील यांनी दिली.

Exit mobile version