| पाली | वार्ताहर |
मुस्लिम सोसायटी डेव्हलपमेंट गृप पाली-सुधागड यांच्यातर्फे रविवारी (दि.9) दुपारी साडेतीन वाजता पालीतील लिमये हॉल येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी विविध कायद्यांची माहिती आणि त्याचे मार्गदर्शन तज्ञ वकीलांद्वारे देण्यात आले.
या शिबिरात प्राथमिक फौजदारी कायद्यांची माहिती ॲड. अजहर मुश्ताक घट्टे यांनी दिली. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा याची माहिती ॲड. सदफ येलुकर यांनी दिली. महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा याबद्दल माहिती ॲड. हिना अकबर नारलेकर यांनी दिली. ग्राहक संरक्षण कायद्याबाबत ॲड. फरहान अ. कादिर मिसरीक यांनी विवेचन केले. माहितीचा अधिकार कायदा ॲड. साईम मो. हनिफ बहुर यांनी समजावून सांगितला. तर मोटार वाहन अधिनियम बद्दल सहाय्य्क पोलीस निरीक्षक श्री. बालवडकर यांनी व वाहतूकीचे नियम व दंड याबाबत श्री. पाटील यांनी माहिती दिली.







