मुरुड येथे कायदेविषयक शिबीर

मुरुड | वार्ताहर |
मुरुड नगरपरिषद येथे महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. मुरुड तालुका विधी सेवा समितीतर्फे अध्यक्ष न्यायाधीश संदीप सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर संपन्न झाले.
राष्ट्रीय सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई व रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार दि. 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये भारतभर जागरूकता अभियान व पोहच या कार्यक्रमांतर्गत मुरुड तालुका विधी सेवा समितीतर्फे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अ‍ॅड. अजित चोगले यांनी स्त्रियांचे हक्क व भ्रूणहत्या प्रतिबंध याविषयी, अ‍ॅड. मृणाल खोत यांनी महिलांवरील अत्याचार प्रतिबंध याविषयी कायद्यांबाबत सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी मुरुड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील, सरकारी वकील संजय राठोड, न्यायालयीन कर्मचारी वर्ग तसेच महिलावर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Exit mobile version