। कोर्लई । वार्ताहर ।
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई व रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या कडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार दि.2 ऑक्टोबर ते दि.14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत भारतभर जागरूकता अभियान व पोहच या कार्यक्रमांतर्गत मुरुड तालुका विधी सेवा समितीतर्फे अध्यक्ष न्यायाधीश संदीप सरोदे यांच्या मार्गदर्शना खाली तालुका पंचायत समितीच्या सभागृहात मानसिक आरोग्य दिनानिमित्त, मानसिक व विकलांग व्यक्ती या विषयावर मार्गदर्शन पार शिबिर आयोजित करण्यात आले होते.
मुरुड विधी सेवा समिती अध्यक्ष न्यायाधीश संदीप सरोदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय हडबे .अन्वर हुसेन, ऍड. डी. एन. पाटील, न्यालयीन कर्मचारी जयेश गुरव, तसेच सर्व शासकिय कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.