। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत नसरापूर हद्दीतील मौजे चिंचवली-गणेगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त भारतभर जागरूकता अभियान पोहचविण्यासाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
ग्रामपंचायत कार्यालयात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक अॅड.संदीप घरत, अॅड. प्रमिला चव्हाण, अॅड.भारती ढाकवळ, माधुरी कराळे, कर्जत कोर्टाचे लेखनिक शरद कांबळे यांनी सार्वजनिक सुविधेबाबत मार्गदर्शन, प्लास्टिक कचरा संकलन व स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी कशाप्रकारे कार्य करायला हवे, दारूबंदीसाठी काय करायला हवे याची माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी सदस्या अमिता देशमुख, सदस्या दीपा कोळंबे, ग्रामसेवक नितीन वैद्य,समाजसेवक संतोष मोहिते, समाजसेवक दशरथ देशमुख, अॅड.श्वेता हडप, ग्रामपंचायत कर्मचारी मोतीराम कोळंबे, शरद तिखंडे, रोशनी कोळंबे, अंगणवाडी सेविका सीमा देशमुख, महिला बचत गटाच्या योगिनी कोळंबे, प्रणय गोतारणे, गौतमी गायकवाड उपस्थित होते.