गुरव समाजाकडून अभिनव उपक्रम
। रसायनी । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यातील अष्टविनायक क्षेत्र महड येथे अखिल गुरव समाज संघटना रायगड ठाणे मुंबई संस्था यांच्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला.यावेळी संघटना आपल्या दारी देवस्थान-जमीन ट्रस्ट संदर्भात उपस्थितांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले.
या अभियानात बर्याच समाज बांधवांनी त्यांचे देवस्थान ट्रस्ट संदर्भातील प्रश्न उपस्थित मान्यवरांसमोर मांडले व आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शन कायदेशीर सल्लागार अँड मुकुंद आगलावे,अँड अण्णासाहेब शिंदे यांनी केले.तसेच गुरव समाजाचे दत्तात्रय मसुरकर,धनजंय दरे,अनिल तोरमडल यांनी देखील उपस्थित गुरव समाज बांधवांना मार्गदर्शन केले. दरम्यान रायगड जिल्हा अखिल गुरव समाज संघटना व गुरव समाज रायगड-ठाणे-मुबंई,संस्था पदाधिकारी व महड गुरव समाजबांधव यांच्यावतीने व्यवस्थितरित्या नियोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी राज्यभरातून मराठवाडा, विदर्भ,खांदेश,कोकण,उत्तर महाराष्ट्र,मुबंई विभाग व इतर विविध जिल्ह्यांतून गुरव समाजाचे महिला पुरुष युवक युवती उपस्थित होते.यावेळी कन्यादिनाचे औचित्य साधुन कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सर्व महिला पदाधिकार्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सुधाकर खराटे,वसंत बंदावनेसर, शिवाजी साखरे,नवल शेवाळे, संतोष वाघमारे, सुभाष आण्णा शिंदे,विलास पाटील,सुरेखा तोरडमल,संगीता गुरव,मनिषा पांडे,श्रद्धा साखरे, अनिल पुजारी,विजय ठोसर,सुरेश गुरव,बंडू खंडागळे व सर्व उपस्थित कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य, पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते.