| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर ईमेल हॅक झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. त्यांच्या मेल आयडीवरून महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांना ईमेल पाठवण्यात आला आहे. या ईमेलबाबत राज्यपाल कार्यालयाकडून विचारणा करण्यात आल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, राहुल नार्वेकर यांच्या मेलवरून राज्यपाल रमेश बैस यांना मेल पाठवण्यात आला होता.
त्यात सदनात काही आमदार योग्य वर्तन करत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, असं लिहिण्यात आलं होतं. हा मेल राज्यपाल रमेश बैस यांना मिळताच राज्यपाल कार्यालयाने राहुल नार्वेकर यांना विचारणा करण्यात आली. राहुल नार्वेकर यांनी राज्यपालांना असा कोणताही मेल पाठवला नसल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, ई मेल हॅक झाल्याचं लक्षात येताच राहुल नार्वेकर यांनी मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. याप्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.