| मुंबई | प्रतिनिधी |
येत्या 27 मार्च रोजी विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी होणार्या निवडणुकीसाठी सहावा अर्ज पुण्यातील उमेश म्हेत्रे यांनी भरला आहे. मात्र, अर्जाबरोबर अनुमोदन आणि सूचक अशा दहा आमदारांच्या सह्या नसल्यामुळे मंगळवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत त्यांचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. फक्त नियमानुसार याची घोषणा 20 मार्च रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी करण्यात येणार आहे. दरम्यान, भाजपाकडून संजय किणीकर, दादाराव केचे, संदीप जोशी. शिवसेना (शिंदे गट) चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)संजय खोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.