| माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुका पूर्व विभाग ओळखल्या जाणार्या पळसगाव भागात मागील 15 ते 20 दिवसांपासुन बिबट्या असल्याचे अनेक गावामधील नागरिकांच्या निदर्शनास आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागात बिबट्याचा वावर असून नागरीकांनी सतर्क राहण्याच्या सूचना माणगाव वन विभागाचे वनरक्षक अनिरुद्ध ढगे यांनी नागरिकांना दिल्या आहेत. वनविभागाला कांही नागरिकांनी माहिती वन विभागाचे कर्मचारी सतर्क झाले असून त्यांनी या भागात गस्त वाढवली आहे.
ढालघर फाटा येथील विंचवली येथील गावातील नागरिकांच्या व होडगाव कोंड येथील कांही दुचाकीस्वारांच्या बिबट्या निदर्शनास आला. त्याचबरोबर आंब्रेवाडी येथील गावातील दोन गुरे त्यांनी खाल्ली असल्याची चर्चा या भागात सुरु आहे. गावातील गुरे रात्रीच्यावेळी बाहेर ठेऊ नये, गुरांना माणसांनी सोबत तीन ते चार माणसे सोबत घेऊन फिरावे, रानात फिरत असताना घोळक्याने राहावे, सोबत मोबाईल असल्यास गाणी चालू ठेवावीत, रानात एकट्याने प्रवास करणे टाळावे. अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पळसगाव भागात बिबट्याचा वावर
