भिरवंडे परिसरात बिबट्याचा वावर

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

रत्नागिरी येथून जवळच असलेल्या भिरवंडे परिसरात सह्याद्री पट्ट्यामध्ये जांभूळ भाबाटलेवाडी येथे सातत्याने बिबट्याचा वावर आढळून येत आहे. गेले काही दिवस वस्तीमध्ये बिबट्या वावरताना दिसत आहे. वाडीतील संतोष सावंत यांच्या घरातील सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचा वावर कैद झाला आहे. त्यामुळे गावामध्ये भीतीचे सावट आहे. पाळीव कुत्र्यांवर हल्ला करण्यासाठी बिबट्या रात्रीच्या वेळी वस्तीत वावरत आहे. सह्याद्री पट्ट्यांमध्ये जंगल वाढल्यामुळे वन्यप्राणी वस्तीत वावरताना दिसत आहेत. त्यामुळे वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Exit mobile version