। मुंबई । प्रतिनिधी ।
नॅशनल पार्कलगत असणाऱ्या मालाड पूर्व येथील न्यू दिंडोशी रॉयल हिल्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि परिसरातही बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचे समोर आले आहे. या परिसरात सुमारे पाच हजार रहिवासी वास्तव्य करीत आहेत. सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या दिवसा आणि रात्री फिरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण आहे. त्यामुळे बिबट्याचे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे.
मुंबईत भरवस्तीत बिबट्याचा मुक्त संचार
