आसियाने गिरविले ग्रामीण उद्योजकता जागृती विकासाचे धडे

शेतकरी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
पाली/बेणसे | वार्ताहर |
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांचे अंतर्गत येणारे अ‍ॅग्रीकल्चर महाविद्यालयात दापोली येथे बीएससी (अ‍ॅग्री) चौथ्या वर्षात शिकणारी आसिया मुश्ताक झोंबरकर या विद्यार्थिनीने आपल्या अभ्यासक्रमांतर्गत असणार्‍या ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजना आणि ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम अभ्यास दौर्‍यासाठी पाली सुधागड येथे भेट दिली. प्रत्येक्ष कामाचा अनुभव घेतला. या कार्यक्रमात तहसीलदार दिलीप रायन्नावार, गटविकास अधिकारी पंचायत समिती सुधागड, कृषी अधिकारी सुधागड यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले. या कामात तिने सुधागडातील नागरिकांना महत्त्वपूर्ण माहिती दिली.
विविध फळझाडे लागवड, भातलागवड, गोपालन, आंबा बागायत, बोडो पेस्ट प्रात्यक्षिक, भात कापणी प्रात्यक्षिक, नारळाच्या झाडाचे उंदीर व इतर सरपटणार्‍या प्राण्यांपासून बचाव करणे, भात बियाणे जमा करणे, साठवणूक करणे, सेंद्रीय पद्धतीने कीटकांपासून रक्षण करणे, गांडूळ खत तयार करणे प्रात्यक्षिक, गिरीपुष्प खत तयार करणे, प्रात्यक्षिक, मत्स्यशेती (शेततळे) संगोपन खाद्य नियोजन, कुक्कुट पालन, पॉवर टिलर चालवणे, महिला गटातर्फे शेतीविषयक राबवले जाणारे विविध उपक्रम माहितीचे आदान-प्रदान केले.
या अभ्यास दौर्‍यास सुधागड पाली येथे आसियाला शरद गोळे व बशीर म. परबलकर यांचे विशेष योगदान लाभले.

Exit mobile version