प्रात्यक्षिक पाहण्यासाठी प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित
| सुधागड -पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यात तिवरे येथे मुक्ता नामदेव भोसले यांच्या आंबा बागेमध्ये कृषी विभाग व माऊली ग्रीन आर्मी या संस्थेच्या वतीने गरुडा एम्परोस्पेस या कंपनीच्या ड्रोनच्या मदतीने कीटनाशक फवारणीचे प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी जे.बी. झगडे तालुका कृषी अधिकारी सुधागड व सर्व कर्मचारी तसे परिसरातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या पिकांवर येणारे कीड व रोगांवर नियंत्रण करण्यासाठी तसेच पाण्याच्या विरघळणारी खते फवारणी द्वारे पिकांना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असते सध्या वेळेवर मजूर मिळणे शक्य होत नाही. तसे महागाईमुळे मजुरी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यावर उपाय म्हणून ड्रोनद्वारे फवारणी व आधुनिक तंत्रज्ञानाची शेतकर्यांना ओळख व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गरुडा एरोस्पेस कंपनीच्या प्रतिनिधींनी या ड्रोन बाबत तांत्रिक माहिती देऊन 7 मिनिटांमध्ये एक एकर क्षेत्रावर प्रत्यक्ष फवारणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यानंतर या तंत्रज्ञान मुळे कशाप्रकारे वेळ व पैसे वाचू शकतात ,औषधे प्रमाण किती घ्यावे. त्याचबरोबर महाडीबीटी द्वारे कृषी विभागामार्फत ड्रोन खरेदीसाठी शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी पदवीधर यांना 75 टक्के किंवा जास्तीत जास्त सात लाख पाच हजार तसे वैयक्तिक शेतकर्यांसाठी 50 टक्के किंवा जास्तीत जास्त पाच लाख इतके अनुदान उपलब्ध असल्याची माहिती दिली