म्हसळा प्राथमिक शाळेचा उपक्रम
| म्हसळा | वार्ताहर |
दिवसेंदिवस नोकरी मिळणे खूप अवघड होत असून, लहानपणापासून विद्यार्थ्यांना लघुउद्योगाची ओढ लागावी या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा म्हसळा येथे विद्यार्थ्यांना राख्या बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. मुख्याध्यापिका सुमित्रा खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक आणि शाळेतील 100 टक्के विद्यार्थी सहभागी झाले होते.
दरम्यान, शाळा वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी तसेच विद्यार्थी विविध स्पर्धात्मक क्षेत्रात नैपुण्य दाखवावे यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करीत असते. या कार्यशाळेस मुख्याध्यापिका सुमित्रा खेडेकर, इंदिरा चौधरी, श्रीधर उमदी, हनुमान खेडका, जयश्री गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मदत केली. या कार्यशाळेचे पालक वर्गाकडून खूप कौतुक होत आहे.