तुतारी फुंकून मविआचे सरकार आणूया- सुरेश बने

। देवरूख । वृत्तसंस्था

देश यांनी निर्माण केलेल्या संविधानावर चालतो. महापुरुषांच्या विचारांना तिलांजली देणार्‍या महायुतीचे भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी आणि सामान्य लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी प्रशांत यादव यांच्यासारख्या दिलदार आणि सुसंस्कृत नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे आता तुतारी ताकदीने घराघरात पोहचवून महाविकास आघाडीचे स्वाभिमानी सरकार आणूया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांनी केले.

संगमेश्‍वर तालुक्यातील प्रचाराचा प्रारंभ देवरूख येथे करण्यात आला. त्या वेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष बने बोलत होते. शेतकर्‍यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळावा, बेरोजगारी हटवून तरुणांच्या हाताला काम मिळावे आणि राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर यावे यासाठी हेवेदावे न करता विरोधकांच्या कुठल्याही मोहाला बळी न पडता चिपळूण-संगमेश्‍वर विधानसभा मतदार संघातील मविआचे उमेदवार प्रशांत यादव यांनाच विजयी करा, असे आवाहन सुरेश बने यांनी केले.

Exit mobile version