बेपत्ता खलाशांच्या वारसांना मदत देऊ

आ.भास्कर जाधव यांचे प्रतिपादन
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
जयगड येथील नवेद-2 ही नौका समुद्रात मासेमारीसाठी गेली असताना खलाशांसह बेपत्ता झाली. या खलाशांच्या वारसांना मदत देण्याचे प्रतिपादन आ.भास्कर जाधव यांनी केले आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, सचिन बाईत, वेळणेश्‍वरचे माजी सरपंच नवनीत ठाकूर, सतीश मोरे, साखरीआगरचे माजी सरपंच विठोबा फणसकर, उपसरपंच सुदाम आंबेरकर, लक्ष्मण पावसकर, पांडुरंग पावसकर, रवींद्र नाटेकर, आत्माराम वासावे आदी उपस्थित होते.
आमदार भास्कर जाधव यांनी साखरीआगर (ता. गुहागर) येथील बेपत्ता झालेल्या खलाशांच्या कुटुंबांची भेट घेतली. स्थानिक मच्छीमारांशी संवाद साधत, बोट कोण, कोणत्या कारणांमुळे बेपत्ता होऊ शकते, याची माहिती घेतली. या वेळी एका बेपत्ता खलाशाच्या मुलाला कॅन्सरवरील उपचारांसाठी अर्थसाह्य मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले तसेच भविष्यनिर्वाह योजनांसाठी महसूल विभागाने तत्काळ सर्व्हे करून लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घ्यावेत, अशी सूचना तहसीलदार वराळे यांना केली.

Exit mobile version