चला, पत्र लिहूया!

Do you write letters anymore? A few determined people are doing their best to keep them arriving in U.S. mailboxes.

पत्र संस्कृतीच्या जतनासाठी ‘वर्डालय’चा पुढाकार
खुली पत्रलेखन स्पर्धा
विजेत्यांना आकर्षक बक्षिसे

पाली/बेणसे | वार्ताहर |
एकेकाळी पत्र हे दूरसंवादाचे एकमेव माध्यम होते. कालपरत्वे संवाद माध्यमांचे जाळे विस्तारत गेले आणि पत्र संस्कृती लोप पावली. पण, संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा काळाच्या पडद्याआड जाऊ न देण्याच्या उद्देशाने वर्डालय मीडिया हाऊसने खुल्या पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा नि:शुल्क असून, खुल्या स्वरुपात आहे. सहभागी होण्यासाठी 10 ऑगस्ट 2021 पूर्वी पत्र पाठविणे आवश्यक आहे. विजेत्यांना रोख बक्षिसे, ग्रंथ आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
समाजमाध्यमांचे वाढते प्रस्थ आणि सुलभ संवाद माध्यमे उपलब्ध झाल्याने पत्रांची देवाणघेवाण पूर्णतः थांबली आहे. पण, पत्रांत स्वतःच्या हातांनी ओतला जाणारा शब्दरुपी मायेचा ओलावा अन्य माध्यमांत अनुभवता येत नाही. त्यामुळे ही संस्कृती जपायला हवी. त्यासाठी वर्डालय मीडिया हाऊसने पुढाकार घेत लिहित्या हातांना बळ देण्यासाठी ही अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक लहान मुले, तरुण व नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने कार्यकर्ते प्रभाकर नाईक यांनी केले आहे.

पत्रातील मजकूर विषयानुरूप असावा, पत्रलेखन मराठी, हिंदी आणि इंग्रजी यापैकी कोणत्याही एकाच भाषेत असावे. पत्र टायपिंग फॉरमॅटमध्येच असणे अनिवार्य आहे. पत्र पाठविताना स्वतःचे पूर्ण नाव, वय, ठिकाण, ई-मेल पत्ता आणि संपर्क क्रमांक लिहिणे आवश्यक आहे, असे आवाहन वर्डालय मीडिया हाऊसतर्फे करण्यात आले आहे.

पत्रलेखनाचे विषय-
1) ‘पावसाला पत्र’, 2) ‘महापुरुषाला पत्र’,
3) ‘नकार दिलेल्या प्रियकर/प्रेयसीला पत्र’,
4) ‘विठ्ठलाला पत्र’, 5) ‘वृध्दाश्रमातून आपल्या मुलाला पत्र’,
6) तुम्हाला आवडत्या कोणत्याही विषयाला पत्र

पत्र कुठे पाठवाल?
संपर्क क्रमांक- 9321836215
ई-मेल आयडी- wordalaymediapublicationgmail.com

Exit mobile version