जनहितांना शेकापचे प्राधान्य राहणार; बीडमध्ये संपर्क कार्यालय

। बीड । प्रतिनिधी ।
बीड येथे सुरु करण्यात आलेल्या शेकापच्या जनसंपर्क कार्यालयातून जनहिताच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मध्यवर्ती समिती सदस्य मोहन गुंड यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते बाबुराव जाधव, अ‍ॅड. नारायण गोले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भाकपचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड ज्योतीराम हुरकुडे, सरपंच कॉ भाऊराव प्रभाळे, माकपचे कामगार नेते कॉ मोहन जाधव, लहु खारगे, सुहास जायभये देविदास जाधव, सुहास झोडगे, मराठा महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष दत्ता शिनगारे, आपचे जिल्हा अध्यक्ष अशोक येडे, भिमराव कुटे, अ‍ॅड. गणेश मस्के, अ‍ॅड योगेश टेकाडे अ‍ॅड राजेश शिंदे, बाजीराव ढाकणे, भाग्यश्री तिडके, संपादक प्रचंड सुळुके, शेकापचे गणपत कोळपे, अशोक रोडे, अ‍ॅड. निखिल बचुटे, मुकुंद शिंदे, अमोल सावंत, अनिल कदम, विष्णू शेळके उपस्थित होते.

जिल्ह्यातील शेतकरी कामगार चळवळीत काम करणार्‍या व्यक्तींनी प्रभावी काम करण्याची गरज असल्याचे उपस्तिथांनी सुचित केले. आठवड्यातून किमान मी दोन दिवस कार्यालयात बसणार आहे शेतकर्‍यांना जिल्ह्याच्या ठिकाणी अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गुंड यांनी सांगितले.

Exit mobile version