प्रभाकर पाटील वाचनालय तर्फे ग्रंथपाल दिन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

ग्रंथालय ही एक सामाजिक संस्था असून समाजाच्या हितासाठी ग्रंथालयाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. ग्रंथालयाचे जतन करणार्‍या ग्रंथपाल हे ग्रंथालयातील महत्त्वाचे घटक असल्याचे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे अलिबाग शाखेचे सहकार्यवाह नंदु तळकर यांनी आज भारतीय ग्रंथालयाचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जन्मदिनानिमित्ताने प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय व ता.ग्रंथालय अलिबाग येथील कार्यक्रमात केले. यावेळी डॉ. रंगनाथन यांच्या भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय व ता. ग्रंथालय अलिबागचे ज्येेष्ठ संचालक ग्रंथमित्र नागेश कुळकर्णी आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे अलिबाग शाखेचे सहकार्यवाह नंदु तळकर यांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक आर. के.घरत, सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय अलिबागचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक, प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय व तालुका ग्रंथालय अलिबागचे ग्रंथापाल ज्योती म्हात्रे, किशोर ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.

प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय व तालुका ग्रंथालय अलिबागचे ग्रंथपाल ज्योती म्हात्रे अठ्ठावीस वर्षे चांगल्या प्रकारे ग्रंथपालपदाची जबाबदारी सांभाळत असल्याने त्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version