। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भारतीय आयुर्विमा महामंडळ पश्चिम क्षेत्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक सी विकास राव हे उद्या, शनिवार 12 फेब्रुवारी रोजी अलिबाग येथे येत आहेत. सी विकास राव हे वित्तीय क्षेत्रातील तीन महत्त्वाचे राज्य म्हणजे महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा यांचे प्रमुख आहेत. अलिबाग येथील एलआयसी कार्यालयाला ते भेट देणार असून, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील शाखा अधिकारी यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती ठाणे विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक सुजय दत्ता यांनी दिली आहे.
सी विकास राव यांनी भारतीय आयुर्विमा क्षेत्रातील पॉलिसीधारकांसाठी आणि विमा प्रचाराकरिता पश्चिम क्षेत्रात अनेक योजना राबवल्या. त्यापैकी हमारा परिवार एलआईसी बीमा परिवार तसेच विमा दाव्यावर भर देऊन पश्चिम क्षेत्राला एक नवीन दिशा दिली आहे. रायगडसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाखा अधिकारी यांना सी विकास राव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.