भेकराला दिले जिवनदान

। पनवेल । वार्ताहर ।
कुंडेवहाळ परिसरात दगडखान परिसरातील कामगारांच्या मुलांना भेदरलेल्या अवस्थेत सापडून आला. ही बाब प्राणी केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे सल्लागार अमोल आंबोलकर या सर्प मित्राला समजताच त्यांनी लागलीच वन्यजीवप्रेमी रायगड भूषण राजू मुंबईकर यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी क्षणांचाही विलंब न करता रात्री अकरा वाजताच्या सुमारास त्या ठिकाणी जाऊन त्या भेदरलेल्या अवस्थेतील भेकराला त्या मुलांकडून आपल्या स्वाधीन घेतले. तसेच याची माहिती वनविभागातील अधिकार्‍यांना कळविली व त्या भेकराला जंगलात सोडून दिले. यावेळी राजू मुंबईकर यांच्यासोबत उरण वनपरिक्षेत्र वनविभागातील वनअधिकारी हरिदास करांडे, राजेंद्र पवार, एस.बी.इंगोले आदी अधिकारीवर्ग उपस्थित होता.

Exit mobile version