| रायगड | खास प्रतिनिधी |
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गरोदर ठेवणाऱ्या रविंद्र महादेव जाधव (वय. 50, रा. खाेपाेली) याला पनवेल येथील सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 25 हजार रुपयांची शिक्षा ठोठावली आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत हाेत आहे. आरोपी रविंद्र महादेव जाधव याने सप्टेंबर 2013 मध्ये अल्पवयीन पिडीतेच्या घरी ती एकटी असल्याचा फायदा घेवून जबरदस्तीने शरीर संबंध केले तसेच आईवडिलांना अथवा अन्य कोणाला सांगितल्यास, तुझी जीभ तोडून टाकेन, अशी धमकी दिली.
त्यानंतर सप्टेंबर 2013 ते जून 2014 या कालावधीमध्ये वेळोवेळी पिडीत मुलीच्या घरी कोणी नसताना पिडीत सोबत शरीरसंबंध केले. त्यानंतर सदरची पिडीता आठ महिन्यांची गरोदर राहिली. याची माहिती पिडीतेच्या आई-वडिलांना कळताच त्यांनी खाेपाेली पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक खोपोली पोलीस ठाणे आर.एन.राजे यांनी सदरच्या गुन्हयाचा तपास पुर्ण करून दोषाराेपपत्र न्यायालयात दाखल केले. सदरच्या खटल्याची सुनावणी सहायक अतिरीक्त सत्र न्यायाधीश शाइदा शेख यांच्या न्यायालयात पार पडली.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला जन्मठेप
