| कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील कोलाड (आंबेवाडी) बाजारपेठेतील गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, या गटाराला झाकण बसवले नसल्याने त्यामध्ये गाय पडून जखमी झाली आहे. येथील नागरिकांनी गायीला बाहेर काढण्यासाठी रेस्न्यू टीमला फोन केला. रेस्न्यू टीमचे सागर दहिंबेकर व सर्व टीम घटनास्थळी दाखल होऊन त्यांच्या प्रयत्नाने गायीला बाहेर काढले आहे.
शुक्रवार, दि.2 ऑगस्ट रोजी गटाराला झाकण नसल्याने गाय गटात पडली. याबाबत व्यावसायिकांच्या लक्षात आले. त्यांनी रेस्न्यू टीमला फोन केला. रेस्न्यू टीम त्वरित दाखल होऊन क्रेनला व गायीला दोरी व पट्टा बांधून गायीला सुरक्षित बाहेर काढले व जखमी झालेल्या ठिकाणी मलम लावण्यात आले. यावेळी रेस्न्यू टीमचे सागर दहिंबेकर तसेच सर्व टीम, अनंत जोशी, प्रफुल्ल बेटकर, चंद्रकांत लोखंडे, आजूबाजूचे व्यावसायिकांनी मेहनत घेतली.