गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टची मॅरेथॉन

| उरण | वार्ताहर |
देशातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ही सामाजिक संस्था कसोशीने प्रयत्न करीत आहे. या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक निधी उपलब्ध व्हावा म्हणून या संस्थेने एक अनोखी मॅरेथॉन स्पर्धा 29 व 30 जानेवारीला आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये देशातील प्रत्येक नागरिक आपल्या घरापासून सामील होऊन गरीब विद्यार्थ्यांच्या कार्यास हातभार लावणार आहे.आपली एक धाव ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करणारी ठरणार असल्याने प्रत्येकाने या अनोख्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन लाईट ऑफ लाईफ ट्रस्टने केले आहे. सद्य परिस्थितीत भारतात माध्यमिक शाळा गळतीचे प्रमाण 70%आहे. त्याची कारणे अनेक आहेत, याचाच विचार करून अश्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी लाईट ऑफ लाईफ संस्था तळागाळात जाऊन कार्य करत आहे. देशातील प्रत्येक नागरिक आपल्या घरापासून नियोजित अंतरा पर्यंत दोन,पाच व दहा किमी धाव घेऊन आपला सहभाग घेऊ शकणार आहे.यासाठी आयोजित मॅरेथॉन मध्ये नोंदणी करून आपलाही सहभाग नोंदवायचा आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात रायगड, जालना, वाशीम, नंदुरबार, यवतमाळ व अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसेच मध्यप्रदेश, ओरिसा आणि राजस्थानमध्ये एकूण 450 गावांमधून 15000 विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबातील 56447 सदस्य लाभांकीत आहेत.


असे करा रजिस्ट्रेशन
https://lolt.cyruns.com लिंक वर क्लिक केल्यानंतर आपणास या स्पर्धेबाबत यासर्व इत्यंभूत माहिती मिळेल.रजिस्ट्रेशन ची सुरुवात रुपये 117, त्यानंतर रुपये 499 आणि रुपये 799 अशी आहे. रुपये 117 रजिस्ट्रेशन मध्ये आपणास ए सर्टिफिकेट बहाल करण्यात येईल. रुपये 499 रजिस्ट्रेशन मध्ये आपणास सर्टिफिकेट आणि मेडल अर्थातच सन्मानचिन्ह बहाल करण्यात येईल.आणि रुपये 798 रजिस्ट्रेशन मध्ये आपणास लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट मॅरेथॉनचे टी-शर्ट, मेडल आणि ए सर्टिफिकेट बहाल केले जाईल
स्वतःसाठी आपण सगळे नेहमीच जगत असतो या छोट्याशा मदतीने ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणामध्ये छोटीशी मदत करून इतरांसाठी जगण्याचा अनुभव घेऊया,आपले रजिस्ट्रेशन आणि आपली धाव या मुलांसाठी खूप मोलाची मदत ठरणार आहे. – सारिका राऊत, रायगड जिल्हा समन्वयक

Exit mobile version