कशेळे परिसरात विजेचा लपंडाव

व्यवसायावर मोठा परिणाम, वीज ग्राहक संतप्त

| नेरळ । वार्ताहर ।

कर्जत तालुक्यातील कशेळे परिसरात गेल्या काही दिवसात विजेचा लपंडाव सुरु आहे. सातत्याने वीज खंडित होण्याचे प्रकार सुरु असून या या विजेच्या लपंडावामुळे येथील व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. आम्ही वीज उपकेंद्रासाठी आमच्या जमिनी दिल्या आहेत आणि त्यावेळी कशेळे भागातील वीज खंडित होणार नाही? असे सांगणारे महावितरण कंपनीचे अधिकारी आहेत कुठे? असा प्रश्‍न व्यवसायिक उदय पाटील यांनी उपस्थित केला आहे.

येणारा पावसाळा लक्षात घेऊन विजेच्या वाहिन्यांच्या बाजूला असलेल्या झाडांची छाटणी करण्यासाठी महावितरणकडून मागील दोन महिन्यापासून दार आठवड्यातून एक दिवस वीज बंद ठेवण्यात येत आहे. मात्र त्यानंतर देखील निर्धारित केलेल्या वेळेनंतर देखील पुन्हा वीज खंडित होण्याचे प्रकार कशेळे उपकेंद्र परिसरात सुरु आहेत. कशेळे येथील उपकेंद्रमधून पोटल, कशेळे, बोरिवली, वैजनाथ, हुमगाव, मांडवणे आणि भिवपुरी या ग्रामपंचायत मधील गावानं वीज पुरवठा होतो. कशेळेपासून काही अंतरावर अंजप रस्त्यावर कळंबोली येथे कर्जत तालुक्याचे 110 केव्हीए क्षमतेचे मुख्य वीज केंद्र आहे. त्या मुख्य केंद्रातून कशेळे येथे असलेले 25 केव्हीए उपकेंद्रमध्ये वीज पोहचली जाते. कशेळे येथे वीज उपकेंद्र उभे करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी जमीन देताना आणि विजेचे खांब उभे करण्यासाठी स्थानिक शेतकर्‍यांनी जमिनी दिल्या आहेत. त्या जमिनीमधून विजेचे खांब उभे करताना महावितरण कंपनीकडून कशेळे वीज केंद्र परिसरात वीज खंडित होणार नाही असे आश्‍वासन दिले होते.

पावसाळा अजून दोन महिन्यावर असताना कशेळे परिसरात विजेच्या वाहिन्यांचे बाजूला असलेल्या झाडांची छाटणी करण्यात येत आहे. त्यास्तही महावितरण करून दोन दिवस आधी शट डाऊन घेत असल्याचे मेसेज सर्व ग्राहकांना दिले जातात. मात्र त्या वेळेनंतर देखील वीज खंडित होत असल्याने कशेळे भागातील वीज ग्राहक संतप्त झाले आहे. त्यात देखील ऐन सायंकाळ आणि रात्रीच्य वेळी वीज खंडित होत असल्याने आदिवासी आणि ग्रामीण भागाची मुख्य बाजारपेठ असलेल्या कशेळे येथे अंधाराचे साम्राज्य असते आणि त्यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.त्यामुळे महावितरण कंपनीने आम्हला ग्रामस्थांना आणि व्यपार्‍यांना दिलेला शब्द पाळावा अशी मागणी व्यावसायिक उदय पाटील यांनी महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना केली आहे.

Exit mobile version