लिओनेल मेस्सी महाराष्ट्रात ट्रेंडींगला

फुटबॉल चाहत्यांना फिफा 2022ची उत्सुकता
। सिद्धी भगत । अलिबाग ।
2022 मध्ये रंगणार्‍या फिफा वर्ल्ड कपच्या सामन्यांसाठी जगभरात उत्सुकता वाढत चाललेली आहे. भारतातही फिफा वर्ल्ड कपचे अनेक चाहते आहेत. सध्या फिफा वर्ल्ड कपहा चर्चेचा विषय बनला असुन कोणकोणते देश या खेळात सहभगी होणार व 2022 विजेते कपा कोण पटकवणर यावर सर्वांचेच लक्ष लागले आहे.
या खेळात नेहमी चर्चेत व अपले कतृत्व स्वबळावर सिद्ध करणारा खेळाडू म्हणजे लिओनेल आंद्रेस मेस्सी होय. मेसीच्या जगभरातल्या चाहत्यांची संख्या वाढताना दिसत आहे म्हणुनच आजचा पाच ट्रेडींग विषयांमध्ये लिओनेल मेस्सीचे नाव आहे. महाराष्ट्रातुनसुद्धा मेस्सीला गुगल सर्च इंजीनद्वारे बहुसंख्य लोकांनी सर्च केले आहे. लिओचा जन्म जन्म 24 जून 1987 ला अर्जेंटिनामध्ये झाला. लहानपणापासुनच त्याला फुटबॉल या खेळाची आवड होती. लिओ हा जर्मेन आणि अर्जेंटिना या राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणुन कार्यरत आहे. मेस्सीने आतापर्यंत 35 विक्रमी ट्रॉफी जिंकल्या आहेत. एक उत्कृष्ट गोल करणारा खेळाडू म्हणुन त्याची जगभरात ख्याती आहे. मेस्सीने क्लब आणि देशासाठी 750 हून अधिक गोल केले आहेत व सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. वयाच्या 22 व्या वर्षी, मेस्सीने पहिला बॅलन डीओर जिंकला. त्यानंतर तीन यशस्वी हंगाम आले, मेस्सीने सलग चार बॅलॉन डीफओर जिंकले, तो चार वेळा आणि सलग हा पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू बनला आहे.
मेस्सीने 2018 मध्ये बार्सिलोनाचे कर्णधारपद स्वीकारले आणि 2019 मध्ये त्याने विक्रमी सहावा बॅलन डीओर जिंकला. युवा स्तरावर, त्याने 2005 वर्ल्ड युथ चॅम्पियनशिप जिंकली, गोल्डन बॉल आणि गोल्डन शू या दोन्हीसह त्याने स्पर्धा पूर्ण केली आणि 2008 ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. ऑगस्ट 2011 पासून संघाचा कर्णधार म्हणून, त्याने अर्जेंटिनाचे सलग तीन अंतिम फेरीत नेतृत्व केले. 2014 विश्‍वचषक, ज्यासाठी त्याने गोल्डन बॉल जिंकला आणि 2015 आणि 2016 कोपा आवृत्तीत मेस्सीनेे गोल्डन बॉल जिंकला. दक्षिण अमेरिकन फुटबॉल चॅम्पियनशिप 2019 मध्ये त्याने संघाला तिसरे स्थान मिळवुन दिले. फ्रान्स फुटबॉलच्या मते 2009 ते 2014 दरम्यान सहा पैकी पाच वर्षे जगातील सर्वाधिक कमाई करणारा फुटबॉलपटू होता आणि 2019 मध्ये फोर्ब्सने जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू म्हणून त्याला स्थान दिले होते. फेब्रुवारी 2020 मध्ये लिओ मेस्सीला लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व हा पुरस्कार जिंकणारा तो पहिला फुटबॉलप्पटू आणि पहिला सांघिक क्रीडापटू बनला. करिअर कमाईत 1 अब्ज ओलांडणारा मेस्सी हा दुसरा खेळाडु बनला आहे तसेच जवळ आलेल्या फिफा वर्ल्डकप 2022 मुळे सध्या ट्रेंडींगला आहे.

Exit mobile version