। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
लायन्स क्लब मांडवा व लायन्स क्लब पोयनाड या दोन्ही क्लबचा २०२२-२३ या वर्षासाठीचा पदग्रहण व शपथविधी सोहळा खडताळ पुलाशेजारील होराईझन मंगल कार्यालयामध्ये बुधवार, ६ जुलै २०२२ रोजी संपन्न झाला. या सोहळ्यात लायन्स क्लब मांडवाचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळकृष्ण कोळी आणि लायन्स क्लब पोयनाडचे अध्यक्ष विकास पाटील यांनी शपथग्रहण करुन आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली.
लायन्स क्लब मांडवा आणि लायन्स क्लब पोयनाड या दोन विभागांच्या सदस्यांच्या पदग्रहण व शपथविधी समारंभासाठी इंस्टाॅलेशन ऑफीसर म्हणून प्रांतपाल, पीएमजेएफ मुकेश तनेजा, तर इंडक्शन ऑफीसर म्हणून पीएमजेएफ संजीव सूर्यवंशी, पीएमजेएफ अनिल जाधव, एक्झी. डिस्ट्रीक्ट कॅबिनेट ट्रेझरल एमजेएफ प्रदीप सिनकर, रिजन चेअरमन महेश मोघे, झोन चेअरमन अंकीत बंगेरा, लायन्स क्लब मांडवाचे मावळते अध्यक्ष मोहन पाटील, लायन्स क्लब पोयनाडचे मावळते अध्यक्ष प्रमोद पाटील आदी मान्यवर विशेष पाहुणे लाभले होते.
याप्रसंगी मांडवा आणि पोयनाड या दोन्ही क्लबच्या नवीन सदस्यांचा शपथविधी व अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांचे पदग्रहण करण्यात आले. लायन्स क्लब मांडवाचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळकृष्ण कोळी, उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर, सचिव सुमीत पाटील, खजिनदार विलास पाटील यांनी, तर लायन्स क्लब पोयनाडचे नवनिर्वाचित अध्यक्ष विकास पाटील, उपाध्यक्ष प्रमोद राऊत, सचिव ओमकार जोशी, खजिनदार कौस्तुभ जोशी यांनी आपापल्या पदाची सूत्रे हाती घेतली.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रगती प्रदीप सिनकर यांनी ईशस्तवन सादर केले. या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब मांडवाचे लायन्स सुबोध राऊत, नितीन अधिकारी, अरविंद घरत, अमीष शिरगावकर, धवल राऊत, अभिजीत गुरव, विद्या अधिकारी, जितेश्री ठाकूर, सागर पाटील, डाॅ. सुबोध नाईक, डाॅ. राजाराम हुलवान, अनिल म्हात्रे, तसेच लायन्स क्लब पोयनाडचे मनीष अग्रवाल, दिलीप गाटे, विनोद पाटील, अरविंद अग्रवाल, मनोहर चवरकर, महेंद्र पाटील, अलिबाग लायन्स क्लबचे अध्यक्ष भगवान मालपाणी, तसेच प्रवीण सरनाईक, नयन कवळे, महेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती.