| पनवेल | वार्ताहर |
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व हॉटेल व्यावसायिक व मद्यविक्री करणार्या व्यावसायिकांवर अता निवडणूक आयोगाद्वारे पुरवठा साखळी व्यवस्थापन अॅप सुरु करण्यात आले आहे. या अॅपमध्ये दररोजची मद्य खरेदी व विक्रीची माहिती संबंधित व्यावसायिकांना द्यावी लागणार आहे. यापुढे मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी मद्याचा महापूर व वाटप कुठल्याच पक्षाला करता येणार नाही आहे. या अॅपमुळे चोरून दारू खरेदी विक्री, बनावट भेसळयुक्त दारू विकता येणार नाही. तसेच, एखाद्याची नेहमी पेक्षा जास्त मद्य विक्री दिसून आल्यास त्याबाबत संबंधित विभागाकडून चौकशी सुद्धा करण्यात येणार आहे.
मद्यविक्रेत्यांवर करडी नजर
