पात्र फेरीवाल्यांची यादी प्रसिद्ध; हरकती व सूचना मांडण्याचे आवाहन

। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।

पालिका अंतर्गत फेरीवाल्यांना सहाय्य या घटकाचे काम पहिले जाते. या घटकांतर्गत करण्यात आलेल्या फेरीवाला सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांची यादी पालिकेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून यावर हरकती व सूचना मांडण्यासाठी पालिकेकडून 25 ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आली आहे.

पालिका क्षेत्रातील विविध भागात मोठ्या प्रमाणात फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. जागा मिळेल त्या ठिकाणी फेरीवाल्यांनी बस्तान बसवले असल्याने या फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याची जवाबदारी पालिका प्रशासनावर येऊन पडली आहे. फेरीवाल्यांची ही समस्या सोडवण्यासाठी व सिडकोने फेरीवाल्यांकरिता राखीव ठेवलेल्या भूखंडावर त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने फेरीवाला समिती स्थापन करण्यात आली असून, पालिका हद्दीतील फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणाला पालिके तर्फे सुरवात करण्यात आली आहे.

पालिके मार्फत सुरु करण्यात आलेल्या या सर्वेक्षणातुन आखून दिलेल्या निकशावर पात्र ठरलेल्या फेरीवलाल्यांची यादी पालिकेच्या संकेतस्थळावर 23 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पालिकेने प्रसिद्ध केलेल्या यादीवर हरकती आणि सूचना मांडण्यासाठी 25 ऑक्टोबर पर्यंत कालावधी देण्यात आल्याची माहिती पालिका अधिकार्‍यांनी दिली आहे. पालिकेच्या स्थापनेनंतर पालिकेत समाविष्ठ सिडको वसाहतीमधील फेरीवाल्यांसाठी राखीव भूखंडांचे हस्तांतरण पालिकेकडे करून घेण्यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नातून जवळपास 55 भूखंडांचे हसतांतरण पालिकेकडे झाले आहे तर काही भूखंडांचे हस्तांतरण पालिकेकडे होणे बाकी आहे. पालिकेकडे हस्ता तरित झालेल्या भूखंडावंर फेरीवाला धोरणा नुसार पात्र फेरीवल्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.

Exit mobile version