देशभरातील राज्य सरकारांकडून घोषणा
| मुंबई | प्रतिनिधी |
2025 वर्षाला सुरुवात झाली आहे. सर्वांनी नव वर्षांचे काही ना काही संकल्प केले असतील. यामध्ये जीएसटी, ईपीएफ, पेट्रोल-डिझेलचे दर यातील बदल सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे आहेत. पण या सर्वात शाळा कॉलेजची मुले नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत असतात. नव्या वर्षात आपल्याला किती सुट्ट्या असणार? याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता असते. याबाबत राज्य सरकारांनी आपापल्या राज्यातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.
आपल्या मित्र आणि नातेवाईकांसोबत सुट्टी घालवण्यासासाठी वर्षभरात किती सुट्ट्या आहेत, याची यादी मुले पाहत असतात. देशातील काही शाळांमध्ये आता हिवाळी सुट्टीही सुरू झाली आहे. मुलांना एन्जॉय करण्याची ही एक चांगली संधी आहे. राज्य सरकारे डिसेंबर महिन्यातच आपापल्या राज्यातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अशा राष्ट्रीय सुट्ट्या सर्व राज्यात सारख्याच असतात. पण, काही सुट्ट्या या राज्याप्रमाणे बदलतात.
बहुतेक राज्यांमध्ये हिवाळी सुट्टी
थंडीच्या दिवसात दिल्ली, यूपी, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीरसह इतर राज्यांमध्ये हिवाळी सुट्टी सुरू झाली आहे. जी जवळपास जानेवारीच्या मध्यापर्यंत चालेल. जम्मू-काश्मीरमध्ये हिवाळी सुट्टी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सुरू आहे.
सार्वजनिक सुट्ट्यांची यादी
प्रजासत्ताक दिन - 26 जानेवारी, महाशिवरात्री- 26 फेब्रुवारी, होळी- 14 मार्च, ईद-उल-फितर- 31 मार्च, महावीर जयंती- 10 एप्रिल, गुड फ्रायडे- 18 एप्रिल, बुद्ध पौर्णिमा- 12 मे, ईद-उल-जुहा (बकरी ईद)- 7 जून, मोहरम- 6 जुलै, स्वातंत्र्य दिन- 15 ऑगस्ट, जन्माष्टमी- 16 ऑगस्ट, मिलाद-उल-नबी (ईद-ए-मिलाद)- 5 सप्टेंबर, महात्मा गांधी जयंती- 2 ऑक्टोबर, दसरा- 2 ऑक्टोबर, दिवाळी- 20 ऑक्टोबर, गुरु नानक देव जयंती- 5 नोव्हेंबर, ख्रिसमस डे- 25 डिसेंबर.







