राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर


| मुंबई | वृत्तसंस्था |

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्यासह देशात घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह 40 प्रचारकांच्या नावांचा यामध्ये समावेश आहे.शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकांचे पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये वर्ध्यातून अमर काळे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून सुप्रिया सुळे, नगरमधून निलेश लंके, तसेच दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर माढा आणि सातारा लोकसभेचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. या जागांचे उमेदवार लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

40 स्टार प्रचारक
राष्ट्रवादी शरद पवार गटानेही आपल्या 40 स्टार प्रचारकांनी यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या या पहिल्या यादीत अमोल कोल्हे, निलेश लंके, राजेश टोपे, एकनाथ खडसे, रोहिणी खडसे याशिवाय, फौजिया खान, पी. सी. चाको, धीरज शर्मा, वंदना चव्हाण, धीरज शर्मा, सिराज मेहंदी, सोनिया दुहान, शब्बीर विद्रोही, यशवंत गोसावी, बाळासाहेब पाटील, पार्थ पोळके, ऍड. जयदेव गायकवाड, शशिकांत शिंदे, अशोक पवार, अरुण लाड, प्राजक्त तानपुरे, सुनील भुसार, नसीम सिद्दीकी, विकास लवंडे, रोहित पाटील, राजू आवळे, मेहबूब शेख, प्रकाश गजभिये, पंडित कांबळे, रवी वरपे, नरेंद्र वर्मा, राज राजापूरकर, संजय काळबांडे, जावेद हबीब, सक्षणा सलगर आणि पूजा मोरे यांचा समावेश आहे.
Exit mobile version