कोकणात साहित्य सृष्टी अवतरली पाहिजे : मधु मंगेश कर्णिक

| रायगड | खास प्रतिनिधी |

कोकणात साहित्य सृष्टी अवतरली पाहिजे, अशी मागणी कोमसापचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी केली. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या 10व्या रायगड जिल्हा साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

किल्ले रायगडच्या पायथ्याशी राजमाता जिजाऊ समाधीस्थळी हा सोहळा पार पडला. याप्रसंगी जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. यावेळी भव्य ग्रंथ दिंडी काढण्यात आली. यावेळी साहित्यिकांना मार्गदर्शन करताना मधु मंगेश कर्णिक यांनी महाराष्ट्र एक व्हावा हा वारसा साहित्यिकांनी जपला आहे. राज्यात साहित्य एक आहे, मराठी भाषा एक आहे, असे कोकण ही साहित्यिकांची बाग आहे. मात्र, अन्य प्रांतात कोकणच्या साहित्यिकांना स्थान नसल्याने कोकणाची स्वतंत्र कोकण मराठी साहित्य परिषद स्थापन करावी लागली. कोकणातील साहित्य संपन्न आणि प्रतिभावंत असल्याचा गौरव करीत कोकणात साहित्य सृष्टी अवतरली पाहिजे, अशी मागणी कर्णिक यांनी केली.

Exit mobile version