चिमुकल्यांना मिळाली हक्काची शाळा

नागाव बंदर येथील अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन


| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील नागाव बंदर येथील नव्या अंगणवाडीचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 15) शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. सुसज्ज अशा अंगणवाडीमुळे हक्काची शाळा मिळाल्याचा आनंद दिसून आला. अतिवृष्टी व निसर्ग चक्रीवादळात खराब झालेल्या नागाव बंदरातील अंगणवाडीची दुरवस्था झाली होती. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या आमदार निधीतून आणि शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील यांच्या प्रयत्नातून सुसज्ज अंगणवाडी बांधण्यात आली. या अंगणवाडीमध्ये विविध सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या अंगणवाडीचे उद्घाटन शुक्रवारी जल्लोषात करण्यात आले.

यावेळी नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, कावीरचे सरपंच राजेंद्र म्हात्रे, नागावचे उपसरपंच सुरेंद्र नागलेकर, सदस्य विणा पिंपळे, अंकिता शेवडे, रोहिणी घरत, लीना म्हात्रे, आदेश मोरे, निकिता पाडेकर, प्रियांका काठे, माजी उपसरपंच श्रीकांत आठवले, मंजुषा राणे, पद्माकर गुरव, अभिराज पाटील, श्रीधर नागवेकर, रवींद्र नागे, गणेश पाटील, अंगणवाडीच्या सुपरवायझर दीप्ती मोकल, अंगणवाडी सेविका सुरेखा वाळंज, नीलम नागवेकर, श्रेया घरत, तेजल राऊळ, दीक्षा कर्णेकर आदी मान्यवर, पदाधिकारी, सदस्य, नागाव, पाल्हे येथील ग्रामस्थ, ज्येष्ठ मंडळी, बच्चे कंपनी, महिला उपस्थित होत्या.

विकास गुरव यांचा सत्कार
खराब झालेल्या अंगणवाडीमुळे चिमुकल्यांची गैरसोय झाली होती. नागावमधील सामाजिक कार्यकर्ते विकास गुरव यांनी पुढाकार घेत चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी सहा महिने जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आले. त्यांचा अंगणवाडी उद्घाटन सोहळ्याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला.

Exit mobile version