| उरण | प्रतिनिधी |
लिटिल आयडल किड्स नवीन पनवेल या स्कूल चा बक्षीस समारंभ आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे गुरुवारी (दि.2) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. स्मरण या संकल्पनेवर आधारित सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
बक्षीस समारंभाच्या या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक गणेश कडू, आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक तथा पत्रकार उत्कर्ष समितीचे रायगड जिल्हा अध्यक्ष मिलिंद खारपाटील, मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक करनिर्धारक व संकलक एम/पूर्व एन.डी. खान, संगीत शिक्षक दिपक कदम, अतुल तांबे, विश्वास भगत, लिट्ल आयडल स्कूल च्या प्रिन्सिपॉल पूनम गुप्ता, चेअरमन मनोज गुप्ता, सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी छोट्या छोट्या बच्चे कंपनीने सुरेख नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली. टाळ्या आणि वन्स मोअर असा जोरदार प्रतिसाद होता. गणेश कडू यांनी विद्यार्थी आणि शिक्षक यांचे तोंड भरून कौतुक केले. याचबरोबर विद्यार्थ्यांची चांगली तयारी केल्याबद्दल शिक्षकांना धन्यवाद दिले.पालकांनी आता निश्चित राहावे. कारण अतिशय चांगल्या शाळेत तुम्ही मुलांना पाठवले आहे असेही ते म्हणाले.
लिटिल आयडल किड्स स्कूलचा बक्षीस समारंभ
