| रत्नागिरी | प्रतिनिधी |
केंद्र शासनाच्या आदेशानुसार पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागामार्फत दर पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येते. यानुसार जिल्ह्यात या मोहिमेला सुरुवात झाली असून 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरु राहणार आहे.
जिल्ह्यात 183 प्रगणक व 40 पर्यवेक्षकांमार्फत ही गणना सुरु आहे. ग्रामीण भागात प्रमुख कृषीपूरक व्यवसाय म्हणून पशुधनास संबोधले जाते. जिल्ह्यातील पाळीव पशुधनाची जात-प्रजातीसह अन्य माहिती संकलित करण्यासाठी पशुगणना केली जाते. या मोहिमेला जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी शुभारंभ केला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. रामचंद्र नरुटे, डॉ. रोहित रानभरे, डॉ. आदिती कसारकर, डॉ. सुचिता शिंदे, विलास लोकरे, निकिता पवार आदी उपस्थित होते.
21 वी पशुगणना करण्याकरिता ग्रामीण भागात 3 हजार कुटुंबामागे एक प्रगणक आणि पाच प्रगणकांमागे एक पर्यवेक्षक तसेच शहरी भागात 4 हजार कुटुंबांमागे एक प्रगणक आणि 10 प्रगणकामागे एक पर्यवेक्षक नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागासाठी 183 प्रगणक व 40 पर्यवेक्षकांमार्फत ही गणना सुरु आहे. पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहे. पशुसंवर्धन विभागाची ध्येय धोरणे ठरवणे. दूध, अंडी, मांस आदींच्या उत्पादनामुळे पोषण सुरक्षेसोबत ग्रामीण उपजीविकेलाही चालना मिळते.
संपूर्ण जिल्ह्यात पशुगणना केली जाणार आहे. ही मोहीम जवळपास तीन महिने राबवण्यात येणार आहे. प्रगणक घरोघरी जाऊन माहिती घेणार आहेत. पशुगणनेतील पशुधनाच्या संख्येनुसार विभागाची पुढील ध्येय धोरणे आणि पशुसंवर्धनविषयक योजना निश्चित करण्यात येणार असल्याने याकरिता पशुपानलकांनी अचूक माहिती पुरवून प्रगणकांना सहकार्य करण्याचे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी केले आहे. पशुपालन क्षेत्राचा शाश्वत विकास घडवण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून पशुपालकांना प्रोत्साहन देते. पशुगणनेत पशुधनाच्या 16 जातींचा म्हणजेच पाळीव प्राणी, कुक्कुटपालन, भटक्या प्राण्यांची पशुगणना करण्यात येणार आहे. पशुगणनेकरता प्रगणकांनी स्वत:चा मोबाईल वापरून माहिती संकलित करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पशुगणनेला प्रारंभ
