पाणी उपसा करणार्‍या लबधी गार्डन्स व्यावसायिकास 40 लाखांचा दंड

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दहिवली तर्फे वरेडी हद्दीत लबदी गार्डन्स या खाजगी गृह विकासकाने 2017 पासून उल्हास नदीतून अनधिकृतरित्या पाणी उपसा केल्याबद्दल त्यांना 40 लाखांचा दंड आकारण्याचे आश्‍वासन पाटबंधारे विभागाने उपोषणकर्ते, उल्हास नदी बचाव नेरळ विभाग चे प्रमुख केशव तरे यांना दिले आहे. टिळक चौक येथे हे उपोषण सुरू करण्याात आले होते.

लबधी गार्डन्स विरोधात तरे यांनी आपले उपोषण सुरू केले. कश्या प्रकारे या विकासकाने पूर्व परवानगी न घेता पाणी उपसा करत आपला प्रोजेक्ट पूर्ण केला. हे दाखवून दिले. दुपारनंतर उपोषण स्थळी कर्जत पाटबंधारे विभागाचे उप अभियंता भरत गुंटूरवार यांनी उपोषण स्थळी भेट देऊन लेखी पत्र देत संबधित विकासकाला प्राथमिक स्वरूपात दंड आकारला असून सदर विषय चौकशी सुरू असल्याचे सांगितले. आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी 1 महिन्यात कारवाई करणयात येणार असल्याच्या अश्‍वासनावर उपोषण मागे घेतले आहे.

Exit mobile version